Headlines

अथायु मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल च्या वतीने १९ ,२० मार्च ला आरोग्य महाशिबिराचे आयोजन…

जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांची माहिती

सावंतवाडी ता.१४-:* अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या सौजन्याने दोडामार्ग तालुक्यात साटेली-भेडशी येथे 19 मार्च 2022 शनिवार रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दिन हॉल येथे रविवार दिनांक 20 मार्च 2022 रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत महाआरोग्य शिबिर आयोजित केली आहे.

तसेच सायंकाळी 3.00 ते 6.00 यावेळेत कुडाळ येथे महाआरोग्य शिबिर होणार आहे. याबाबतची माहिती जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page