भाजपाच्या निवेदनानंतर वेंगुर्ला-पणजी फेरी सुरु करण्याचे आश्वासन

वेंगुर्ला प्रतिनिधी-सद्यस्थितीत एसटीचे कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे एसटी वाहतूक हळुहळू सुरु होताना दिसत आहे. मात्र, जास्त भारमान असलेली पणजी एसटी सुरु करण्यात आलेली नाही. वेंगुर्ला-आगाराची पणजी एस.टी.ची फेरी येत्या आठ दिवसात सुरु करावी अन्यथा भाजपा वेंगुर्ल्याच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा वेंगुर्ला आगार व्यवस्थापकांना भाजपा शिष्टमंडळाने दिला. दरम्यान, या निवेदनाची दखल घेत आगार व्यवस्थापकांनी तात्काळ वरीष्ठांशी चर्चा करुन बुधवारपासून पणजीसाठी सकाळी ६.३० व दुपारी २.४५ अशा पूर्वीप्रमाणे दोन फे-या सुरु करण्याचे अभिवचन दिले.

यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, स्मिता दामले, अॅड.सुषमा खानोलकर, शितल आंगचेकर, दादा केळुसकर, वसंत तांडेल, बाबली वायंगणकर, प्रशांत आपटे, श्रेया मयेकर, जयंत मोंडकर, प्रणव वायंगणकर, मनवेल फर्नांडीस केशव नवाथे, वृंदा गवंडळकर, रसिका मठकर, ओंकार चव्हाण, हर्षद साळगांवकर, भुषण सारंग, संतोष खानोलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page