पंचनाम्याचे कागद देण्यास टाळाटाळ केल्याने वनअधिकाऱ्याच्या विरोधात ठिय्या आंदोलन…

वनविभाग समोर सामाजिक कार्यकर्ते जयंत बेरगाव यांनी पुकारले ठिय्या आंदोलन….

सावंतवाडी ता.१४-:माजगाव येथील बदली पास पंचनामे व महत्त्वाचे कागदपत्र वन अधिकाऱ्यांनी गायब केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते जयंत बेरगाव यांनी केला असून, वारंवार मागणी करूनही वन अधिकारी सर्जेराव सोनवडेकर यांनी पंचनाम्याचे कागद देण्यास नकार दिल्याने आज त्यानी अचानक येथील वनविभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

यावेळी त्यांनी जोपर्यंत कागद आपणाला मिळत नाही. तोपर्यंत आपण उठणार नाही. असा इशारा दिला आहे. यावेळी आपण त्या अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

You cannot copy content of this page