जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ
सावंतवाडी ता.१३-:* मळेवाड येथील श्री कुलदेवता विद्यामंदिर मळेवाड नं. २ शाळेला प्राप्त झालेल्या नाविन्यपूर्ण विज्ञानप्रयोग केंद्राचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राप्त झालेल्या तसेच जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांच्या विषेश प्रयत्नातून सावंतवाडी तालुक्यातील श्री कुलदेवता विद्यामंदिर मळेवाड नं. २ या शाळेला १४ लाख रुपयांचे विज्ञानप्रयोग केंद्र मिळाले. या उदघाटन प्रसंगी प्रथम इशस्तवन, स्वागतगीत, त्यानंतर सर्व मान्यवरांचे शाळेच्या मुख्याध्यापिका दीक्षा आडारकर यांनी सुपारी रोप देऊन स्वागत केले.
यावेळी मळेवाड कोंडुरे सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाट, सानिका शेवडे, मधुकर जाधव, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष नारायण मुळीक, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन त्यानंतर विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांनी शारदा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी आपण सर्वजण मिळून शाळ व गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करून विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन केले. यावेळी सरपंच मिलन पार्सेकर यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. शाळेच्यावतीने जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, सरपंच मिलन पार्सेकर , उपसरपंच हेमंत मराठे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञानप्रयोग केंद्रात प्रात्यक्षित दाखवत मान्यवरांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक लवू सातार्डेकर तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख म. ल. देसाई यांनी केले.
