कोकण मराठी साहित्य परिषदेची नूतन कार्यकारणी जाहीर…

तालुकाध्यक्ष पदी अँड. संतोष सावंत यांची नियुक्ती; कोमसाप ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा सावंतवाडी इथं पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित कार्यकारिणी स्थापन करण्यात आली.

यात तालुकाध्यक्ष अँड. संतोष सावंत, उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, कार्यवाह प्रा. प्रतिभा चव्हाण, सहकार्यवाह राजु तावडे, कोषाध्यक्ष डॉ. दिपक तुपकर, सदस्य अँड. नकुल पार्सेकर, दीपक पटेकर, अँड. अरुण पणदुरकर, प्रा. रुपेश पाटील, पत्रकार विनायक गांवस, सौ. प्रज्ञा मातोंडकर, सौ. मेघना राऊळ, कवी विठ्ठल कदम, भरत गावडे, ज्येष्ठ सल्लागार म्हणून डॉ. जी.ए. बुवा, प्रा. सुभाष गोवेकर, वाय.पी.नाईक, ज्येष्ठ साहित्यिका उषा परब, सलीम तकीलदार यांची निवड करण्यात आली. यावेळी कवयित्री मंगल नाईक-जोशी, रामदास पारकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी सांगितले की कोकण मराठी साहित्य परिषद नितिमूल्यावर चालणारी ही साहित्यिक संघटना अधिक वृद्धिंगत करण्यासाठी नवीन कार्यकारणी चांगले प्रयत्न करेल असा आशावाद आहे असे सांगत जिल्हाध्यक्ष श्री मस्के यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली.

नवनिर्वाचित अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत म्हणाले की सर्व मान्यवर यांच्या मार्गदर्शनाने आणि साहित्यिकांच्या सहकार्याने सावंतवाडी शाखेच्या माध्यमातून अधिक उपक्रम राबविण्यासाठी मी कटिबद्ध असेल. नाविन्यपूर्ण उपक्रमातून सर्वांच्या मदतीने कोमसाप अधिक दर्जेदार पणे करू अशी ग्वाही एडवोकेट सावंत यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी देखील पदाला न्याय देत साहित्यिक संघटना अधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केल. तर एडवोकेट नकुल पार्सेकर प्राध्यापक रुपेश पाटील ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर जी. ए. बुवा आदींनी मनोगत व्यक्त केले नवीन कार्यकारिणी शुभेच्छाही दिल्या. दरम्यान ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आल. प्रस्ताविक ज्येष्ठ साहित्यिका उषा परब यांनी केले . तर मागील सभेचे इतिवृत्त व आढावा प्राध्यापिका प्रतिभा चव्हाण यांनी सादर केला. शेवटी भरत गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

You cannot copy content of this page