सावंतवाडी ता.१३-:* तालुक्यातील सातार्डा येथे श्री देव महापुरुष पारावर सार्वजनिक सत्यनारायण पूजन उत्सव मोठ्या थाटात पार पडला गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना काळामुळे हा उत्सव साधेपणाने साजरा केला जात होता मात्र यंदा तालुक्यासह जिल्हाभरातून आणि शेजारच्या गोवा राज्यातून भाविकांनी सत्यनारायण पुजेसाठी उपस्थिती दर्शविली यंदा पूजेचा मान मकरंद मांजरेकर उभयताना मिळाला सकाळी पूजेला सुरुवात झाल्यानंतर दुपारी महाप्रसाद आणि त्यानंतर तीर्थप्रसाद व दर्शनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी श्रीफळ केळी आदी नेवेद्य अर्पण करण्यात आला तर नववधू सुहासिनी माहेरवाशिणीनी पूजनासाठी मोठी उपस्थिती लावली होती तीर्थप्रसादानंतर पावणी चा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये शेकडो भाविक सहभागी झाले होते. श्री देव महापुरुष पारावर झालेल्या कार्यक्रम मध्ये रात्री बारा वाजता दत्त माऊली दशावतार मंडळ दाभोली यांचा दशावताराचा नाट्यप्रयोग झाला या सार्वजनिक सत्यनारायण पूजन उत्सवामध्ये श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानचे प्रमुख शेखर प्रभू यांनी दर्शन घेतले तर उत्सव यशस्वी करण्यासाठी बागकर तानावडे शिरसाठ केरकर मांजरेकर पिळणकर आदी कुटुंबीयांनी परिश्रम घेतले नव्या तरुण पिढीने या उत्सवात सहभाग घेतला
