कणकवली 13 मार्च (प्रतिनिधी)- खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कुल मधील इयत्ता १० वी च्या विद्यर्थ्यांचा शुभेच्छा तथा सदिच्छा समारंभ नुकताच संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच सम्पन्न झाला. या कार्यक्रमाला राजापूर तालुक्याचे चार्टर्ड अकाँउटर (CA) सिद्धेश अनिल करंगुटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तर संस्थेचे उपाध्यक्ष भिकाजी कर्ले, सचिव – महेश कोळसुलकर,सांचालक – रघुनाथ राणे,विजय देसाई, सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे ,हायस्कुलचे मुख्यध्यापक प्रकाश अकिवाटे, पर्यवेक्षक – संजय सानप आदी प्रमुख मान्यवर उवस्थित होते.तर इयत्ता १० वी चे वर्गशिक्षक श्री संतोष राऊत, लक्ष्मीकांत हरयाण व इतर विषय शिक्षक वृंद उपस्थित होते.
यावेळी इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी १० वी च्या विद्यार्थ्यांना आपली मनोगते व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. तर इयत्ता १० वी च्या अ आणि ब तुकडीच्या विद्यार्थ्यांनी मिळून शाळेला वस्तुरुप देणगी भेट म्हणून दिली. “विद्यार्थ्यांनी १० वी च्या बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना न घाबरत आत्मविश्वासाने बिनधास्त जावे.व करिअर डोळ्यासमोर ठेऊन पेपर मन लावून सोडवावा.”असे भावपूर्ण उदगार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चार्टर्ड अकाऊंटंट सिद्धेश करगुंटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,प्राचार्य डॉ ए डी कांबळे ,मुख्यध्यापक अकिवाटे, पर्यवेक्षक संजय सानप,वर्गशिक्षक श्री राऊत ,हरयाण सर,गिरी सर,यांनी आपली मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सानप सर यांनी केले.व पाहुण्यांची ओळख राऊत यांनी करून दिली.तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव मोटे यांनी केले.शेवटी सर्वांचे आभार शाळेच्या शिक्षिका श्रीम.प्राजक्ता कोकाटे यांनी मानले
