मालवण ता.१३-:* श्री देव खापरेश्वर वाचनालय व ग्रंथालय, कोळंबतर्फे आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन व गुणगौरव कार्यक्रम कोळंब येथील श्री समर्थ मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
यावेळी कोळंब सरपंच प्रतिमा भोजने, वकील प्रतिभा जामदार, सीया धुरी, दीपा फाटक, स्वाती सावंत, एकता ढोलम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चारुशीला देऊलकर, प्रतिमा भोजने, प्रतिभा जामदार, दर्शना प्रभूगावकर, सुनील फाटक यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी अंजली मेथर, श्रेया धुरी, संगीता मेथर, प्रियांका फणसेकर, अरुण ढोलम, बापू बावकर, सुंदर परब, मानसिंग लाटकर (सचिव). मनोहर सावंत, प्रकाश परब, मनोहर भोजने उपस्थित होते. सूत्रसंचालन पूनम लाड यांनी केले. स्वागत ग्रंथपाल लावण्या सारंग, आभार सुनील फाटक यांनी मानले.
