शहरात भाजपचे मध्यवर्ती कार्यालय व्हावे…

बंटी पुरोहित व आनंद नेवगी यांची जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडे मागणी; तेलींचा सकारात्मक प्रतिसाद…

सावंतवाडी ता.१२-:* सावंतवाडी शहरात भाजपचे मध्यवर्ती कार्यालय व्हावे यासाठी आज भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बंटी पुरोहित व माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे लक्ष वेधले असून, यावेळी राजन तेली यांच्याकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी येत्या आठ दिवसात मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आज सावंतवाडी भाजप तालुका कार्यकारणी बैठकीसाठी सावंतवाडी येथे आले असता, त्यांच्याकडे ही मागणी केली आहे.

You cannot copy content of this page