कणकवली ता.१२-:* जागतिक महिला दिन जि. प. केंद्र शाळा नांदगाव नंबर १ येथे विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला आहे.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच आफ्रोजा नावळेकर यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या प्राथमिक आरोग्यकेंद्र नांदगावच्या डॉ. वाळके , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रणाली बिडये, उपाध्यक्षा रंजना वाळके, केंद्रप्रमुख अनघा चिपळूणकर, ग्रामपंचायत सदस्या ईशा बिडये होत्या. प्रास्ताविक शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक सुहास सावंत यांनी केले. कोव्हीड योद्धा सन्मानही यावेळी करण्यात आले.
यात अंगणवाडी सेविका संतोषी मोरये, मदतनीस गीता मोरये, आशा सेविका अनिता बांदेकर, सुमती मोरजकर, यास्मीन साटविलकर यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना ठाकुर यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध पदार्थांच्या खाऊ गल्लीचे उद्घाटन रंजना वाळके यांच्या हस्ते, विद्यार्थी शिक्षक निर्मित साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन प्रणाली बीडये यांच्या हस्ते, पाककला स्पर्धेचे उद्घाटन डॉ.श्रीमती वाळके यांच्या हस्ते झाले. होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये उपस्थित बहुसंख्य महिलांनी सहभाग घेत छान रंगतदारपणा आणला. कार्यक्रमास शिक्षण सहाय्यक मंडळ नांदगावचे अध्यक्ष नागेश मोरये यांनी शुभेच्छा दिल्या.
बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास पं.स. सदस्या हर्षदा वाळके उपस्थित होत्या. होम मिनिस्टरच्या प्रथम मानकरी ठरल्या ईशा बिडये, द्वितीय सुप्रिया पाताडे, तृतीय लतिका बिडये,पाककलेमध्ये प्रथम क्रमांक मिनाज साटविलकर, द्वितीय अंकिता पाटील तर तृतीय साक्षी बिडये. या सर्वांना आकर्षक आणि बहुपयोगी बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला. तर पाककलेमध्ये सहभागी सर्वांना भेट वस्तू देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या शिक्षिका गितेश्वरी वळंजू, प्रतिमा पोकळे, दीपिका चव्हाण, अमरीन शेख, शालेय पोषण आहार स्वयंपाकी साक्षी बिडये, मदतनीस अक्षता कोदे तसेच शाळा स्तरावरील विविध समित्या, संघ, पालक, ग्रामस्थ, हितचिंतक यांचे सहकार्य लाभले.
