माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धा

भाजपचे युवा नेते विशाल परब : 16 रोजी प्रकाशझोतात आयोजन

कुडाळ ता.१२-:* भाजप राज्य प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त विशाल परब मित्रमंडळ आणि कुडाळ भाजपच्या संयुक्त विद्यमाने १६ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता भव्य अशा प्रकाश झोतातील मॅट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले निलेश राणे साहेबांचा वाढदिवस ही आमच्यासाठी एक पर्वणीच असते. निलेश राणे साहेबांनी आपल्या जीवनात गोरगरिबांना वेळोवेळी मदत केली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही कोरूना काळात गरीब कुटुंबाचे छत्र हरवलेल्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणार आहोत.याशिवाय आमचे नेते निलेश राणे यांचा या स्पर्धेच्या निमित्ताने भव्य दिव्य सत्कार करणार आहोत.

ही स्पर्धा भव्य दिव्य होणार असून भाजपचे दिग्गज नेते मंडळी या निमित्ताने त्या स्पर्धेला उपस्थिती लावणार आहे.ह्या स्पर्धेची घोषणा विशाल परब यांनी यावेळी केली. श्री. विशाल परब मित्रमंडळ सिंधुदुर्ग, भारतीय जनता पार्टी कुडाळ व सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने, कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशन व स्थानिक कबड्डी मंडळ यांच्या सहकार्याने भव्य-दिव्य प्रकाशझोतातील  खुल्या कबड्डी स्प्रधेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी बक्षीसांचे स्वरूप खालीलप्रमाणे:-  प्रथम क्रमांक :- २५,०४२ /- रोख रक्कम व भव्य चषक(श्री. विशाल परब मित्रमंडळ सिंधुदुर्ग पुरस्कृत), द्वितीय क्रमांक:- १५,०४२ /- रोख रक्कम व भव्य चषक(श्री. विशाल परब मित्रमंडळ सिंधुदुर्ग पुरस्कृत),तृतीय क्रमांक:- १०,०४२ /- रोख रक्कम व भव्य चषक(श्री. विशाल परब मित्रमंडळ सिंधुदुर्ग पुरस्कृत),चतुर्थ क्रमांक: – ५,०४२ /- रोख रक्कम व भव्य चषक(श्री. विशाल परब मित्रमंडळ सिंधुदुर्ग पुरस्कृत), सर्वोकृष्ट खेळाडू :- २,५४२ /- रोख रक्कम व चषक (श्री. विशाल परब मित्रमंडळ सिंधुदुर्ग पुरस्कृत),उत्कृष्ट चढाई:- १,५४२ /- रोख रक्कम व चषक (श्री. विशाल परब मित्रमंडळ सिंधुदुर्ग पुरस्कृत),उत्कृष्ट पकड:- १,५४२ /- रोख रक्कम व चषक (श्री. विशाल परब मित्रमंडळ सिंधुदुर्ग पुरस्कृत).अशा पद्धतीची बक्षिसे असणार आहेत. यावेळी कुडाळ एमआयडीसी रेस्टहाऊसवर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साहिल, दीपक नारकर, मोहन सावंत, पप्प्या तवटे, राकेश कांदे,सचिन धुरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page