कणकवली तालुका शिवसेनेतर्फे २१ मार्च रोजी शिवजयंती उत्सव

कणकवली ता.१२-:* शिवसेना तालुका कणकवलीच्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव २१ मार्च रोजी साजरा करण्यात येत आहे . तरी शिवजयंती उत्सव कमिटी अध्यक्ष पदी राजू राठोड, उपाध्यक्ष निसार शेख, खजिनदार पदी सुनील पारकर यांची नियुक्ती तालुका कार्यकारणी बैठकीत करण्यात आली आहे.

या शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता शिवप्रतीमेचे पूजन करण्यात येणार आहे .यावेळी खा.विनायक राऊत, पालकमंत्री मा.उदय सामंत , संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर सहसंपर्क प्रमुख अप्पा पराडकर ,आ.वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर , अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी प्रमुख सौ. नीलम पालव ,सचिन सावंत ,कन्हैया पारकर ,बाळा भिसे उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ८ वा. सत्यनारायणाची महापूजा त्यानंतर सायंकाळी ६ वाजता भजनांचा कार्यक्रम, ७ ते १० पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी; महिला पदाधिकारी; तसेच युवासेना पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख शैलेश भोगले व उत्सव प्रमुख राजू राठोड तसेच कणकवली शहरप्रमुख शेखर राणे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page