निवडणूक जिंकण्यासाठी बूथ संघटना मजबूत करा

जिल्हाध्यक्ष राजन तेली : सावंतवाडी तालुका भाजप कार्यकारणी बैठक कार्यकर्त्यांना केले आवाहन

सावंतवाडी ता.१२-:* आगामी निवडणुकीसाठी प्रथम भाजपची बूथ संघटना मजबूत होणे गरजेचे असून, तरच आपण निवडणुका जिंकू शकतो. त्यामुळे पहिल्यांदा बूथ संघटना मजबूत करा. असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केले आहे. सावंतवाडी तालुका भाजप कार्यकारणीची बैठक आज सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉल मध्ये संपन्न झाली.यावेळी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी निर्माण केलेल्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा, ज्या ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता नाही, ती ग्रामपंचायत भाजपकडे येण्यासाठी काम करा. निवडणूक लढवताना एकजूट महत्वाची असून, एकत्र राहिलो तरच आम्ही सर्व निवडणुका जिंकू शकतो. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.

You cannot copy content of this page