सेजल बाईत ठरल्या होम मिनिस्टर स्पर्धेच्या मानकरी

पदर महिला प्रतिष्ठानचे आयोजन:अभिनेते दिगंबर नाईक यांची खुमासदार मालवणी

कणकवली ता.०९-:* पदर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या होम मिनीस्टर स्पर्धा ही रंगतदार व आव्हानात्मक झाली.या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या सेजल बाईत,द्वितीय क्रमांक सानिका नारकर यांनी प्राप्त केला तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या भक्ती गवळी.विनोदी अभिनेते दिगंबर नाईक यांनी मालवणी भाषेत उपस्थित महिला वर्गाला खेळवुन ठेवले.या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेत 300 हुन अधिक महिलांनी सहभाग घेतला.दरम्यान या स्पर्धेनिमित्त लकी ड्रॉ काढण्यात आला होता या मधील 25 लकी प्रेक्षकांना बक्षीस म्हणून कुकर देण्यात आला.

यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,प.स.सदस्य भाग्यलक्ष्मी साटम, प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मेघा गांगण, उपाध्यक्षा हर्षदा गवाणकर, खजिनदार सुप्रिया नलावडे, , सदस्या दिशा अंधारी, साक्षी वाळके, प्रियाली कोदे, अंकिता कर्पे, दीक्षा राणे, सल्लागार कविता राणे, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, वर्षा बांदेकर, संजीवनी पवार, संजना सदडेकर, प्राची कर्पे, राजश्री रावराणे, सायली मालंडकर,संजविनी पवार, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, अँड. विराज भोसले, बंडू गांगण,अण्णा कोदे,किशोर राणे, भरत उबाळे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page