महिला दिनानिमित्त करण्यात आला सन्मान
सावंतवाडी ता.०८-:लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी च्या माध्यमातून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला असून, त्या निमित्त आज सावंतवाडी पोलिस स्थानकातील सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच ज्येष्ठ लायन सदस्या सौ. सुनेत्रा फाटक यांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष ला अँड. परिमल नाईक, ला. अमेय पई, ला. गजानन नाईक, ला. अशोक देसाई, ला. बाळ बोर्डेकर, ला. संदेश परब आदी लायन सदस्य उपस्थित होते.
