आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मधील मुलींना सायकल वाटप…

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि जन शिक्षण संस्थे मार्फत राबविण्यात आला उपक्रम

सावंतवाडी ता.०८-:* मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पने अंतर्गत जन शिक्षण संस्था सिंधुदुर्ग तर्फे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून आणि गोवा विमान प्राधिकरण यांच्या माध्यमातून आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मधील मुलींना सायकल वाटप करण्यात आले आहे.

यासाठी विलास हडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. यावेळी जिल्हा सचिव संजय नाईक, तालुका सरचिटणीस नारायण कांबळी, युवा उपतालुका प्रमुख सावंतवाडी सिद्धेश कांबळी यांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थिती होते.

You cannot copy content of this page