महिलांची छेडछाड बंद झाली तरच महिला दिन कार्यक्रमाचे फलित

जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांचे प्रतिपादन

ओरोस ता.०८-:अंगणवाडी सेविकांनी माझ्या सारख्या अनेक महिलांना घडविले आहे. कोरोना काळात रस्त्यावर उतरून काम केले आहे. शरीर दिसते पण मेंदू दिसत नाही. परंतु मेंदू शरीरावर नियंत्रण ठेवत असतो. त्याप्रमाणे लहान मुलांचे मेंदू म्हणजे अंगणवाडी सेविका आहेत. आजच्या मुलांच्या मनामध्ये जबाबदारीची जाणीव करून देण्याची जबाबदारी महिलांची आहे. ज्यावेळी रस्त्यावर चालणाऱ्या महिलांची छेडछाड काढण्याचे बंद होईल. त्यावेळी महिला सुरक्षित राहील. त्याचवेळी खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी महिला दिन व अंगणवाडी सेविका पुरस्कार कार्यक्रमात बोलताना केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने महिला दिनाचे औचित्य साधत जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात २०२०-२१ मधील आदर्श अंगणवाडी सेविका-मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अध्यक्ष म्हणून म्हणून सौ सावंत बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page