Headlines

महिलांना ३६५ दिवस हवा सन्मान

महिला दिन कार्यक्रमात;जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांचे प्रतिपादन

ओरोस ता.०८-:८ मार्च आला की त्यादिवशी महिलांचा सन्मान करायचा. एक गुलाब द्यायचा, एवढे पुरेसे नाही. महिलांचा सन्मान ३६५ दिवस झाला पाहिजे. गुलाब न देता पुरुषाने स्वतःच्या हाताने एक कप चहा बनवून दिला तरी मोठा सन्मान आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घरातील महिलांचे मोठे योगदान असते. ती ऑफिस सांभाळताना घरही सांभाळते. म्हणून महिलांनी आता सामाजिक बदल घडवून आणताना स्वतःकडे लक्ष दिला पाहिजे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. महिलांनी आपल्यावरच थोडे दयाळू बनले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी महिलादिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने महिला दिनाचे औचित्य साधत जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात २०२०-२१ मधील आदर्श अंगणवाडी सेविका-मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मंजुलक्ष्मी बोलत होत्या. संजना सावंत अध्यक्ष स्थानी होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page