अंगणवाडी सेविका,मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण संपन्न

ओरोस ता.०८-:एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, अंगणवाडी मिनी सेविका तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना 2021-22 चे आदर्श पुरस्कार देऊन महिला दिनी गौरविण्यात आले. जिल्ह्यातील ४९ अंगणवाडी सेविका व ४९ मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका आठ आणि पर्यवेक्षिका तीन अशाप्रकारे कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व बचतपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत व जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, विनीत म्हात्रे, अमोल पाटील, मोहन भोई यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page