कातवड येथे संपन्न झाला जीआय मार्गदर्शन कार्यक्रम

ओरोस ता.०८-:7 मार्च 2022 रोजी कातवड पाळशीवाडी येथे भौगोलिक मानांकन (जीआय) बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.शासनाच्या कृषी विभागाने जिल्ह्यात अशाप्रकारे प्रथमच जीआय मानांकनसाठी कार्यक्रम राबविला आहे. यावेळी व्यासपीठावर कातवड सरपंच उदय नाईक, स्नेहसिंधु पदवीधर संघ सिंधुदुर्गचे सचिव डी आर परब, काजू उद्योजक तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकम महासंघाचे अध्यक्ष सुरेश नेरुरकर, गोपुरी आश्रम कणकवलीचे व्यवस्थापक शैलेंद्र डीचोलकर, कृषी पर्यवेक्षक एस जी परब, डी डी गावडे, डी के सावंत, ग्रामसेविका सौ युती चव्हाण, आत्मा समन्वयक निलेश गोसावी, रिलायंस फाउंडेशनचे श्री गावडे उपस्थित होते. स्नेहसिंधुचे सचिव श्री परब यांनी आंबा पिकाचे भौगोलिक मानांकन, त्याची गरज, नोंदणी व त्याचे फायदे याविषयी माहिती दिली तसेच सुरेश नेरुरकर व श्री डीचोलकर यांनी काजू व कोकम जीआय मानांकन बाबत माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांचे जीआय नोंदणी करून देणार असल्याचे ही सांगितले. जीआय मानांकन जनजागृती करण्यासाठी मालवण तालुका कृषी अधिकारी व कृषी विभागाने जिल्ह्यात प्रथम कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी सतत तीन वर्षे प्रथम आंबा बाजारपेठेत पाठविण्याचा मान मिळवणारे उत्तम फोंडेकर व सूर्यकांत फोंडेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरेश परब, उपसरपंच गणेश चव्हाण, काशीराम चव्हाण, शिवराम चव्हाण, सुजय घाडी यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page