महिलांना जिल्हा बँक घरपोच सेवा देणार

बँक आयोजित महिला दिन;कार्यक्रमात अध्यक्ष मनीष दळवी यांची ग्वाही

सिंधुदुर्गनगरी ता ०८ जिल्ह्यातील महिलांसाठी जिल्हा बॅँकेमार्फत विशेष योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून १ एप्रिल पासून योजना राबविण्यास सुरुवात केली जाणार आहे. प्रत्येक महिलेला चागली सेवा देण्यास कटिबद्ध असून वृद्ध महिलांना घरपोच सेवा दिली जाणार आहे. असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज महिला मेळाव्यात बोलताना केले . जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सिंधुदुर्गनगरी येथील अध्यापक पतपेढी सभागृहात आज ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि. प .अध्यक्षा संजना सावंत,जिल्हा बँक संचालक नीता राणे,प्रज्ञा ढवण, नाबार्डचे प्रबंधक श्री थोटे ,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपमुख्य कार्यकरी अधिकारी प्रमोद गावडे उपस्थित होते. यावेळी बँक अध्यक्ष दळवी बोलताना म्हणाले की ,जिल्हा बँकेच्या कारभारात महिलाचा फार मोठा वाटा आहे. महिला कर्मचारी ४० टक्के आहेत .बँकेने ७ हजार महिला स्वयंसहायता बचत गटांना पतपुरवठा केलेला आहे. महिलांसाठी नेहमीच जिल्हा बँकेने सहकार्याचा हात पुढे केलेला आहे. तसेच आता महिलांसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहेत .प्रत्येक महिलेपर्यत चांगली सेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे असे दळवी म्हणाले. कोरोना काळात महिलांनीच घर सावरले -संजना सावंत गल्ली पासून दिल्ली पर्यत आता महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर दिसू लागल्या आहेत .त्यामुळे आता पुरुष दिन साजरा करण्याची वेळ आली आहे. महिलांना चांगले व्यासपीठ मिळू लागले आहे. कोरोना काळात ज्यावेळी सर्व कामकाज ठप्प झालं होतं त्यावेळी महिलांनीच घराची पूर्ण धुरा सांभाळली होती.अश्या समस्त महिला भगिनींचा अभिमान असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी यावेळी बोलताना केले. जि. प अध्यक्षा संजना सावंत याना डॉ.विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशन दिल्ली, यांच्या वतीने सर्वोकृष्ट महिला पुरस्कार मिळाल्याबद्दल महिला मेळाव्यात त्यांचा जिल्हा बँकेच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच वेंगुर्ला तालुक्यातील वेतुरे येथील कर्णबधिर पूजा रुपाजी धुरी हिचा सत्कार करून दहा हजाराची मदत देण्यात आली. तर उपस्थितांचे आभार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी मानले.

You cannot copy content of this page