माजी नगरसेविका दीपाली भालेकर यांनी केले मार्गदर्शन
सावंतवाडी ता.०८-:* वि स खांडेकर विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन श्री धुमाळे तर आभार श्री परीट यांनी मानले.
यावेळी माजी विद्यार्थिनी पूजा पेडणेकर,कोळी सर, कुंभार मॅडम आदी उपस्थित होते.
