भंडारी भवन येथे जागतिक महिला दिन साजरा…

महिला दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यां महिलांचा करण्यात आला सत्कार

सावंतवाडी ता.०८-:* जागतिक महिला दिनानिमित्त सावंतवाडी भंडारी भवन येथे महिला दिन साजरा करण्यात आला.दिनांक ७ रोजी पाककला स्पर्धा घेण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांक डाॅ.सौ.निकीता देव्या सुर्याजी द्वितीय क्रमांक सौ.संगिता समीर हडकर तृतीय क्रमांक श्रीमती शामल शरद धुरी उत्तेजनार्थ सौ.संजना कोरगांवकर यांना देण्यात आले.

त्याचप्रमाणें प्रश्नमंजुषा हि स्पर्धा घेण्यात आली.दिनांक ८ मार्च रोजी सौ.हेमा देसाई ह्या प्रमुख अतिथी होत्या व त्यांनी महिलांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले.

यावेळी महिलांसाठी संगीत खुर्ची हा खेळ घेण्यात आला यामध्ये सौ.पूर्वा मंदार केरकर व डॉ.निकीता देव्या सुर्याजी यांनी बक्षिस पटकावले. पूरस्कारप्राप्त सौ.समृद्धी संजय पिळणकर व डॉ.निकीता देव्या सुर्याजी यांचा सत्कार शाल व श्रीफळ देउन करण्यात आला.यावेळी भंडारी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.शितल नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस समारंभ झाला.प्रास्ताविक सौ.वैशाली पटेकर व सौ.समता सुर्याजी यांनी आभार मानले यावेळी श्रीमती देवता पेडणेकर,सौ.दर्शना पेडणेकर,सौ.वसूधा उपरकर, सौ.उमा वराडकर,सौ.लक्ष्मी सावंत,सौ.अपेक्षा साटेलकर,संगिता हडकर,सौ.उज्वला पराडकर व इतर सर्व महिला उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page