ग्रामपंचायत खारेपाटणतर्फे महिलांना विविध लघु उद्योगांचे मोफत प्रशिक्षण

कणकवली ता.०८-:* कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने येथील गरजू महिलासाठी छोट्या – छोट्या घरघुती लघु उद्योगांचे मोफत प्रशिक्षण लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी दिली.

खारेपाटण ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोग निधी मधून हे प्रशिक्षण देण्यात येणार असून यामध्ये १)कागदी कापडी पिशव्या – fancy पर्स बनविणे २)अगरबत्ती धूप,कापूर इ. सुगंधित उत्पादने बनविणे. यांचा समावेश असून यामध्ये प्रशिक्षणार्थी संख्या ३० तर प्रशिक्षणाचा कालावधी ३ दिवसांचा ठेवण्यात आला आहे. तरी प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी आपला अर्ज दि.१७/३/२०२२ पर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावा असे आवाहन खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ग्रामविकास अधिकारी जि सी वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page