जागतिक महिलादिनी कामगार महिला एकवटल्या; सरकारचे वेधले लक्ष
कणकवली ता.०८-:* विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार महिलांच्या समस्यांबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली कामगार महिलांनी चक्क जागतिक महिला दिनी येथील प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला . यावेळी महिला कामगारांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासह विविध घोषणांनी परिसर निनादून सोडण्यात आला . मोर्चाचा प्रारंभ येथील पटकीदेवी मंदिर येथून करण्यात आला .
तेथून आप्पासाहेब पटवर्धन चौक मार्गे महामार्गावरून मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयासमोर दाखल झाला . मोर्चादरम्यान कामगार महिलांनी ‘ भारतीय मजदूर संघाचा विजय असो ‘ , ‘ महिला कामगारांना समान काम समान वेतन , समान वागणूक मिळालीच पाहीजे ‘ , ‘ बेराजगार भत्ता मिळालाच पाहीजे ‘ , ‘ कामगार महिलांना न्याय मिळालाच पाहीजे ‘ यासारख्या घोषणा दिल्या . महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ त्वरीत कार्यान्वित करावे , असंघटीत क्षेत्रातील महिला कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष अभियान राबवावे , कामगार कल्याण बोर्डाची स्थापना करावी , कामगारांसाठी राज्य विमा योजची रुग्णालये प्रत्येक जिल्ह्यात सुरू करावी , विविध उद्योगांमध्ये स्थानिक महिला कामगारांना प्राधान्य द्यावे , अशा विविध मागण्या करण्यात आल्या . मोर्चामध्ये मजदूर संघाचे कोकण विभाग संघटनमंत्री हरी चव्हाण , सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विकास गुरव , सचिव सत्यविजय जाधव , कार्याध्यक्ष भगवान साटम , कोषाध्यक्ष सुधीर ठाकूर , प्रदेश सदस्या अस्मिता तावडे , कणकवली महिला प्रमुख शुभांगी सावंत , कुडाळ महिलाप्रमुख जयश्री मडवळ , देवगड महिलाप्रमुख गीतांजली शेडगे , प्रमुख कार्यकर्त्या पल्लवी गुरव , स्वाती आंबेरकर आदी सहभागी झाले होते .. मोर्चामध्ये महिला कामगारांची लक्षणिय उपस्थिती होती .
