कै. लीलाधर हडकर यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन…

मालवण दि प्रतिनिधी मालवण स्पोर्टस असोसिएशनच्या वतीने कै. लीलाधर हडकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त दि. १२ आणि १३ मार्च या दोन दिवशी वयोमर्यादा ११, १३, १५ आणि १७ वर्षे याप्रमाणे मुले आणि मुली अशा दोन गटांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रवेशाची अंतीम तारीख ११ मार्च आहे. ही स्पर्धा मालवण टेबलटेनिस अकॅडमी, रेवतळे, मालवण येथे होणार आहे, अशी माहिती मालवण स्पोर्टस असोसिएशनकडून आली आहे. गट क्र. १ मुलगे –  ११ वर्षाखालील मुलगे, १३ वर्षांखालील मुलगे, १५ वर्षांखालील मुलगे आणि १७ वर्षांखालील मुलगे. गट क्र. २ – ११ वर्षाखालील मुली, १३ वर्षाखालील मुली, १५ वर्षाखालील मुली आणि १७ वर्षाखालील मुली या प्रमाणे दि. १२ व १३ मार्च २०२२ रोजी मालवण टेबलटेनिस अकॅडमी, रेवतळे, मालवण या ठिकाणी होणार आहे.  या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेच्या प्रवेशासाठी अंतिम दिनांक ११ मार्च २०२२ असून स्पर्धेची वेळ, प्रवेश आणि इतर माहितीसाठी श्री. विष्णु कोरगावकर, ८०८०२४८२०२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page