मालवण ता.०७-:* सुवर्ण महोत्सव समिती जि.प. प्राथमिक शाळा बुडक्याचीवाडी (तुळसुली) यांच्यावतीने गेली २ वर्षे प्रशालेत विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून आय अंतर्गत ,मुंबई सीमाशुल्कचे कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांचा मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्राथमिक शाळा बुडक्याचीवाडी येथे संपन्न झाला. या पंचक्रोशीतील मुलांनी, पालकांनी उत्सर्फुतपणे या व्याख्यानात सक्रिय सहभाग घेत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी सत्यवान रेडकर, सौ.सुचिता तुळसुलकर सरपंच, ग्रामपंचायत तुळसुली तर्फ माणगाव, डाॅ. आनंद कासवेकर, किरण गोडकर, अध्यक्ष मकरंद नाईक श्री.गावडे, अंगणवाडी सेविका सौ.नाईक, ग्रा.पं. कर्मचारी श्रीम. सावंत आदी मान्यवर तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वतीच्या मुर्तीस पुष्पहार घालून व दिप प्रज्वलनाने करण्यात आली.
प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख सुनिल नाईक, सचिव यांनी केले. कार्यक्रमाच्यावेळी श्री. रेडकर, सौ.तुळसुलकर, डाॅ. आनंद कासवेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील स्मार्ट लिडर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्धल सुनील नाईक यांचा श्री.रेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. काही पालक व विद्यार्थी यांनी मार्गदर्शनाबद्दल मनोगत व्यक्त केले. वाडीतील मकरंद नाईक, रुपेश तुळसुलकर, सुदिन मेस्री, विठ्ठल गोलतकर, संतोष गोलतकर,महेंद्र नाईक,दत्तप्रसाद गोलतकर,शुभम नाईक,आदेश कदम, कासवेकर बंधु यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. कुडाळ पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, भाई बिले यांचेही सहकार्य लाभले. सुत्रसंचालन तंत्रनिकेतन मालवणचे प्रा. दत्तप्रसाद गोलतकर यांनी केले. आभार माजी विद्यार्थिनी दिव्या नाईक हिने मानले.
