कणकवली ता.०७-:* महिला दिनाचे औचित्य साधून कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या पदर प्रतिष्ठानच्यावतीने कणकवली कॉलेजच्या मैदानावर होत असलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेकरिता सुप्रसिद्ध कॉमेडी मराठी अभिनेता दिगंबर नाईक यांची विशेष उपस्थिती असणार आहे. पदर प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या होममिनिस्टर स्पर्धेचे संपूर्ण अँकरिंग म्हणजेच भावोजींच्या भूमिकेत दिगंबर नाईक असणार आहेत.
दिगंबर नाईक हे मराठी चित्रपट सृष्टीतील सर्व परिचित असे नाव असून, ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र देखील आहेत. त्यांच्या विनोदी अभिनयाची भूरळ अवघ्या मराठी चित्रपट सृष्टीला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुपुत्राला या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. कणकवली कॉलेजच्या पटांगणावर उद्या 8 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता ही स्पर्धा होणार असून, पदर प्रतिष्ठान च्या माध्यमातून महिला दिनाचे औचित्य साधत या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर सकाळच्या सत्रात कणकवली नगर वाचनालयाच्या हॉलमध्ये लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे व पदर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात आवश्यकता भासणाऱ्या महिलांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. अशी माहिती पदर प्रतिष्ठानचे संस्थापक तथा कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली
