कणकवली ता.०७-:* माघी गणेश जयंती उत्सव समिती कलमठ लांजेवाडी यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी उपचार व विनामूल्य औषधोपचार शिबिर आयडियल नर्सिंग स्कूलचे डॉ.अनिल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० ते २ या वेळेत श्री गणेश मंदिर लांजेवाडी कलमठ येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिरामधे एकूण ८० रुग्णांनी लाभ घेतला.
त्यांना अनुभवी डॉक्टरांकडून सल्ला व मार्गदर्शन तसेच निदान झालेल्या आजारांवर मोफत औषधोपचार करण्यात आले . या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कलमठचे युवा नेतृत्व तथा ग्रामपंचायत सदस्य संदीप मेस्त्री , लांजेवाडी ग्रामपंचायत सदस्य सचिन बांदिवडेकर , डॉ. अनिल ठाकूर , उत्सव समिती अध्यक्ष महेश परब , उपाध्यक्ष सुनिल चव्हाण , सचिव प्रशांत पाष्टे , सहसचिव अनिल पाष्टे , ज्येष्ठ नागरिक शिवाजी परब , काका अरदकर महिला अध्यक्ष सौ . शर्मिला चव्हाण , संतोष परब , संदीप पाष्टे , अमित चव्हाण , विजय दळवी नाना चिंदरकर , रमेश चव्हाण , समिती सर्व पदाधिकारी , सदस्य , कार्यकर्ते , ग्रामस्थ , महिला , डॉक्टर कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते .
