जीवन स्त्रोत सेवा संस्थेचा महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात

दिव्यांगाना ‘जीवनस्त्रोत’ चे मानसिक पाठबळ कौतुकास्पद

कणकवली ता.०७-:* जीवन स्त्रोत सेवा संस्थेचा महिला दिनाचा कार्यक्रम कणकवलीत उत्साहात संपन्न झाला.या वर्षी संस्थेच्या वतीने दिव्यांग महिला व मुलींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर, प्रांताधिकारी वैशाली राजमाने , साहस प्रतिष्ठान अध्यक्षा रुपाली पाटील, ग्रामसेविका संगीता पाटील, जिल्हा दिव्यांग समिती अध्यक्ष अनिल शिंगाडे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. कमलताई परुळेकर यांनी उपस्थित सन्मानर्थिना खंबीरपणे जगण्याचे आणि संघटित होऊन काम करण्याचे आवाहन केले. त्यांच्या कौतुकाच्या शब्दांनी सर्व दिव्यांगांना मानसिक बळ मिळाले. जीवन स्त्रोत सेवा संस्थेला पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. प्रांताधिकाऱ्यांनी सन्मानासाठी आलेल्या सर्व दिव्यांगांना त्यांच्यातील असीम शक्तीची जाणीव करून देत त्यांना सामान्य माणसे त्यांच्या समोर किती छोटी आहोत हे ही बोलून दाखविले. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल जीवन स्त्रोत सेवा संस्थेचे अभिनंदन करण्यात आले. आज खऱ्या अर्थाने महिला दिनास न्याय मिळाला.”असे गौरवोद्गार काढले.

जीवन स्त्रोत सेवा संस्थच्या अध्यक्षा शीतल मांजरेकर यांनी गेल्या चार वर्षांतील संस्थेच्या कार्याचा आढावा देत दिव्यांगांशी संवाद साधताना दिसलेली त्यांच्यातील असीम शक्ती, मनोधैर्य, जगण्याची जिद्द या गुणांचे कौतुक केले आणि आपण सामान्य माणसे किती छोट्या छोट्या गोष्टी वर तक्रारी करीत असतो हे लक्षात आणून दिले. या सोहळ्यात सर्वांना गहिवरून आले. जेव्हा अनिता साळगावकर हीचा सन्मान करण्यात आला.

अनिताने एक तिची कविता वाचून दाखवताच सर्वांच्या डोळ्यात आनंदाचे कौतुकाचे अश्रू तरळले. पवित्रा तळगावकर हीची छोटीशी मूर्ती दोन्ही हातात कुबड्या असूनही सर्वांपेक्षा उंच भासत होती. या सर्वांना एकत्र आणण्यासाठी ग्रामसेविका संगीता पाटील तसेच अनिल शिंगाडे यांनी खूप सहकार्य केले. या साठी संस्थेच्यावतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. या सोहळ्यासाठी संस्थेच्या सदस्य शोभा चौकेकर, संयोगिता मुसळे, मृण्मयी जाधव, कविता मसुरकर, मुग्धा आचार्य, कल्पना मसुरकर, सुश्मिता बावदाने, ज्योती सुळेभावी, सायली साबळे,अनिता पवार,अर्चना माणगावकर यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page