कबुलायतदार गावकऱ्यांचे उद्याचे आंदोलन स्थगित…

आमदार दीपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित; १४ मार्च पर्यंत प्रश्न न सुटल्यास १५ मार्च पासून पुन्हा आंदोलन…

आंबोली ता.०८-: आंबोली येथील कबुलायतदार गावकर जमीन वाटप व अन्य प्रलंबित मागण्यासाठी उद्या दिनांक ८ मार्च रोजी महसूल कार्यालयासमोर गावकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन आमदार दीपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे.

आमदार दीपक केसरकर यांनी १४ मार्च पर्यंत प्रलंबित विषयांबाबत ठोस निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन १४ मार्च पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. यावेळी सर्व प्रलंबित मागण्यांबाबत १४ मार्च पर्यंत योग्य व सकारात्मक कार्यवाही होऊन निर्णय न झाल्यास १५ मार्च पासून पुन्हा आंदोलन सुरू केले जाईल. असा इशारा देखील गावकऱ्यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page