वेतोरे साई मंदीराचा १६ वा वर्धापन दिन १३ मार्चला

वेंगुर्ला ता.०६-:* वेतोरे-देऊळवाडी येथील गुरुकृपा उद्योगालय आवारातील श्री साईबाबा मंदिराचा १६ वा वर्धापन दिन सोहळा रविवारी १३ मार्च रोजी साजरा होत आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच अखंड महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यानिमित्त सकाळी श्रींच्या मूर्तीवर अभिषेक, १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, १२ वाजता आरती आणि तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत अखंड महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता नेरुर येथील बाल भजन, सायंकाळी ६ वा.आंदुर्ले येथील ह.भ.प. सदाशिव सुरेश पाटील यांचे कीर्तन, सायंकाळी ९ वा. श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ तेंडोली यांचे भजन आणि रात्रौ १० वाजता खानोलकर दशावतार मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. या सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना आणि महाप्रसादाला उपस्थित राहण्याचे आवाहन वैभव गोगटे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page