विविध ४० प्रकारच्या फळांच्या नैवेद्याचे खास आकर्षण
वेंगुर्ला ता.०६-:* खानोली सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान मधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा २८ वर्धापन दिन सोहळा सोमवार दि.१४ मार्च फाल्गुन शुद्ध आमलकी एकादशी व मंगळवार दि. १५ मार्च रोजी द्वादशी या दोन दिवसांत विविध धार्मिक आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न होत आहे.
त्यानिमित्त १४ मार्च रोजी सकाळी ९ वाजता आवळीवृक्षाचे पूजन, सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नामवंत बुवांचे चक्रीकीर्तन, दुपारी १ः३० वाजता आरती तीर्थप्रसाद अल्पोपहार, सायंकाळी ७ः३० वाजता धुपारती पालखी प्रदक्षिणा, सायंकाळी ७ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग, १५ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत श्रींचा नामघोष श्री गुरुव्यासांची पुनःप्रतिष्ठापना, दुपारी १ वाजता आरती, तीर्थप्रसाद, पालखी प्रदक्षिणा, दुपारी १ः३० ते ४ वाजेपर्यंत महापसादाचा कार्यक्रम, सायंकाळी ४ः३० वाजता परमपूज्य दादा पंडित महाराज यांचा विठ्ठल पंचायतनाची निर्मिती व अध्यात्मिक प्रबोधनातून जनतेस मार्गदर्शन यावर माहिती देणारा कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता भोईचे केरवडे येथील स्वरसाधना संगीत मैफिल, रात्री ८ वाजता श्री सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ कुडाळ भजन असे कार्यक्रम होणार आहेत.
खानोली-सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थानच्या २८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून खास ३३ कोटी देवता व ७ सप्तर्षी अशा ४० जणांना विविध प्रकारच्या ४० फळांचा नैवेद्य दाखविण्याचा विशेष आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असा हा आगळावेगळा सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच खानोली सुरंगपाणी येथील धर्मस्थानावर संपन्न होत आहे.
या वर्धापन दिन सोहळ्यात आयोजित केलेल्या धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक अशा सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविक व रसिकांनी बहुसंख्येने घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल पंचायतन देवस्थानचे व्यवस्थापक दादा पंडित महाराज यांनी केले आहे.
