विविध मोफत कोर्सचे देण्यात येणार प्रशिक्षण; रघुनाथ तानावडे यांची माहिती
सावंतवाडी ता.०६-: प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन मंगळवारी ८ मार्च रोजी होणार आहे. येथील केंद्राला ५ स्टार रेटिंग मिळाले असून यात विविध मोफत कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.१५ मार्च पासून कोर्सची सुरुवात होणार असून जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षक संस्थेकडे संपर्क करून आपले नाव नोंदणी करावी असे आव्हान एस एस आय कॉम्प्युटर संस्थेचे संस्थापक रघुनाथ तानावडे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
