जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत श्रद्धा पाटकर प्रथम

वेंगुर्ला ता.०६-:* वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कणकवली-हुंबरट येथील श्रद्धा सतीश पाटकर हिने प्रथम, देवगड-गवाणे येथील प्रार्थ प्रदिप सावंत याने द्वितीय तर नेमळे येथील संगीता पुंडलिक नाईक हिने तृतीय क्रमांक पटकावला.

वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीतर्फे ‘युवा पिढीसमोरील आव्हाने आणि संधी‘ या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत २८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे परिक्षण अॅड.देवदत्त परुळेकर यांनी केले.

या स्पर्धेचे बक्षिस वितरण रविवार १३ मार्च रोजी साई डिलक्स हॉल, सुंदरभाटले येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page