Headlines

आठ दिवसात पाणी प्रश्न न सुटल्यास जनआंदोलन…

मेटवाडी ग्रामस्थांचा लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांना इशारा….

सावंतवाडी ता.०६-:* येथील माजगाव मेटवाडी भागाला कुणकेरी धरणातून पाणी पुरविले जाते होत हा धरण प्रकल्प उभारण्यासाठी गावचे सुपुत्र माजी राज्यमंत्री भाईसाहेब सावंत यांचा मोलाचा वाटा होता. मात्र या धरणातुन येणारे पाणी आता बंद केल्याने मेटवाडा ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे अशी खंत आज ग्रामस्थांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

तर अनेक लोकप्रतिनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता फक्त आश्वासनावर समाधानी राहावे लागले यामुळे आता येत्या आठ दिवसात हा पाणी प्रश्न न सुटल्यास वाड्यातील सर्व लोकांना घेऊन जनआंदोलन उभारू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

You cannot copy content of this page