क्रिकेट विश्वाला हादरा

महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नवी दिल्ली दि.०४-:* क्रिकेट विश्वातून अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, दिग्गज शेन वॉर्न यांचं वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगातील क्रिकेट विश्वासाठी ही हादरवणारी बातमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन महान क्रिकेटर शेन वॉर्न त्यांच्या घरात बेशुद्धावस्थेत सापडले. अनेक क्रिकेटरांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेन वॉर्नचं असं जाणं अनेकांसाठी धक्का आहे. वीरेंद्र सेहवागनेही ट्वीट करून शेन वॉर्नच्या निधनानंतर आपली भावना व्यक्त केली आहे.

You cannot copy content of this page