देवगड ता.०३-:* देवगड येथील शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल, देवगड या शाळेचा १०४ वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिय समितीचे सदस्य मिलिंद कुबल, अनुश्री पारकर, डॉक्टर पुष्कर आपटे मुख्याध्यापक संजीव राऊत, पर्यवेक्षक तानाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मिलिंद कुबल यांच्या हस्ते शालेय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते १०४ वी ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक संजीव राऊत यांनी शाळेच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी मिलिंद कुबल यांनी एक माजी विद्यार्थी व संस्था पदाधिकारी या दुहेरी भूमिकेतून मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांमार्फत ‘ध्वज वरा आज तुझा सन्मान’हे शालेय ध्वजगीत सादर केले गेले. मान्यवरांच्या हस्ते’श्रीराम’या शालेय वार्षिक हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी पाटील यांनी तर निवेदन व आभार सागर कर्णिक यांनी केले.
