वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिला भंडारी समाज रत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर…

मुंबई मुलुंड येथे 6 मार्च रोजी भंडारी समाजाच्या मान्यवरांच्या हस्ते होणार वितरण..

मालवण ता.०४-:* मसुरे गावची कन्या आणि कुडाळ जुनियर कॉलेज कुडाळ विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कुमारी वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिला भंडारी एकीकरण समिती या देश पातळीवर ते काम करणाऱ्या समितीच्या वतीने राज्य स्तरीय भंडारी समाजरत्न पुरस्कार 2022 जाहीर झाला आहे. याचे वितरण रविवार दिनांक 6 मार्च रोजी राजे संभाजी सांस्कृतिक सभागृह मुलुंड पूर्व येथे होणार आहे.

वैभवी पेडणेकर हिने आज तागायत कराटे, नृत्य, क्रीडा, समाजसेवा, गरीब विद्यार्थी दत्तक, विविध सांस्कृतिक कार्यक्रम सहभाग, तसेच कला, क्रीडा, सामाजिक,साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवान कामगिरी केली आहे. कराटे आणि महिला दशावतार ही कला देश पातळीवर ती नेण्यासाठी मोलाची कामगिरी केली होती. या कार्याची दखल देश पातळीवर ती काम करणाऱ्या भंडारी समाजाच्या भंडारी एकीकरण समिती ने घेऊन वैभवी पेडणेकर इला भंडारी समाज रत्न पुरस्कार 2022 जाहीर केला.

त्याचे वितरण रविवार दिनांक सहा मार्च दोन हजार बावीस रोजी सकाळी 11 वाजता राजे संभाजी सांस्कृतिक सभागृह मुलुंड पूर्व येथे होणार आहे. भंडारी समाजाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण होणार आहे. वैभवी पेडणेकर हिला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे…

You cannot copy content of this page