मालवण तहसील व सद्गुरू समर्थ महा ई सेवा केंद्राचा उपक्रम
मालवण दि प्रतिनिधी महाराजस्व अभियानांतर्गत शालेय विद्यार्थी व नागरिकांना विविध प्रकारचे दाखले दिले जातात. त्या अनुषंगाने अल्प दरात तसेच शाळेमध्ये दाखले वितरित करण्यात येणार आहेत.. यासाठी मालवण तहसीलदार कार्यालय आणि सद्गुरू समर्थ महा ई सेवा केंद्र. वराडच्या सौजन्याने दि ७ मार्च रोजी महाशिबिराचे आयोजन केले आहे.
दि ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता वराड येथील हिराबाई वरस्कर विद्यामंदिर व दुपारी ३ वाजता तळगाव हायस्कूल येथे हे शिबीर होणार असून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महा ई सेवा केंद्र चालक राजन माणगावकर व मंडळ अधिकारी उमेश राठोड यांनी केले आहे.
