सावंतवाडी ता.०४-:* राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘माझे मत माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य’ या विषयावर पाच प्रकारच्या स्पर्धा खुल्या गटासाठी आयोजित केल्या आहेत. यात प्रश्नमंजुषा, व्हिडिओचित्रण, भित्तीचित्र (पोस्टर), गायन, घोषवाक्य आदी स्पर्धाचा समावेश आहे.
या स्पर्धा २५ जानेवारी ते १५ मार्च या कालावधीत आयोजित करावयाच्या आहेत. विविध श्रेणीनुसार पारितोषिके दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी www.ecisveep.nic. in/contest/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
