भटवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा १३ वा वर्धापनदिन सोमवारी ७ मार्चला होणार साजरा…

सावंतवाडी ता.०४-:* शहरातील भटवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा तेरावा वर्धापनदिन सोमवारी ७ मार्च रोजी साजरा करण्यात येणार असून, यानिमित्त विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्री विठ्ठल रखुमाई राजोपचार पूजा, श्री दत्त महापूजा, श्री सत्यनारायण महापूजा अशा धार्मिक विधी होणार असून, सायंकाळी मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा होणार आहे.

त्यानंतर कुडाळ येथील अभंग महिला भजन मंडळाचे भजन होणार असून, त्यानंतर वेंगुर्ला येथील सद्गुरू प्रासादिक भजन मंडळाचे भजन होणार आहे. यावेळी भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page