मालवण ता.०३-:* एसएसपीएम लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे यांच्या वतीने दि. ५ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत मेढा- मालवण येथील विद्याधर जोशी निवास (ग्रामीण रुग्णालय समोर) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये हृदयरोग, नेत्र तपासणी, प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग तपासणी, युरोलॉजी, अस्थीरोग तपासणी तसेच ईसीजी, बीएसएल, बोन डिसीज आदी तपासण्या करण्यात येणार आहेत. तरी गरजू व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी बाबा मोंडकर (९४२११५३०३५), गणेश कुशे (८२०८०७३१०६), सौ. ममता वराडकर (८२०८४५४९७५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
