देवगड जामसंडे शहराचा अनियमित पाणीपुरवठा सुरळीत करा

गटनेते शरद ठुकरुल;एक महिन्याचे पाणी बिल माफ करा, भाजप शिष्टमंडळाची नगराध्यक्षा यांच्याकडे मागणी

देवगड ता.०३-:* देवगड जामसंडे शहराला गेली काही दिवसापासून अनियमित कमी दाबाचा पाणीपुरवठा होत असून प्रसंगी काही भागात नळपाणी योजनेवर नागरिक अवलंबून असून नागरिकांचे अपुऱ्या पाणीपुरवठा अभावी फार मोठी गैरसोय होत आहे.तरी हा पाणीपुरवठा सुरळीत करावा तसेच ग्राहकांना अपुरे पाणीपुरवठा होत असल्याने एक महिन्याचे बिल माफ करावे अथवा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देवगड जामसंडे नगरपंचायत मधील विरोधी पक्ष भाजप नगरसेवकांचे शिष्टमंडळाने नगराध्यक्षा साक्षी प्रभू व मुख्यधिकारी कौस्तुभ गव्हाणे याना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनात नमूद केले प्रमाणे , देवगड जामसंडे शहरात सध्या मागील एक महिन्यापासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे देवगड प्रादेशिक नळ योजना तसेच इतर नऊ गावांचे आहेत. परंतु सध्या शहराला या योजनेचे पाणी किती मिळते, कमी पाणीपुरवठा का? होतो याचा खुलासा करावा तसेच दहीबाव अन्नपूर्णा पूरक नळ योजनेवरून देवगड जामसंडे शहराला पाणीपुरवठा अनियमित होत आहे त्या योजनेची पाईप लाईन वारंवार लिकेज होत असून या नदीवरील बंधारे का? घातले गेले नाही. नगरपंचायतीच्या नोटीस बोर्डवर पाणीपुरवठा बंद असल्याची नोटीस का? देत नाही. मागील एक महिन्यात तीन ते चार वेळाच पाणी पुरवठा झाला असून जनतेची गैरसोय होत आहे. यावर योग्य ती उपाययोजना करून देवगड जामसंडे शहराला पाणीपुरवठा सुरळीत करावा तसेच मागील महिन्याचे पाणी बिल माफ करावे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांना निवेदनाद्वारे दिला.

यावेळी भाजप गटनेते शरद ठुकरूल नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, अरुणा पाटकर, स्वरा कावले,आद्या गुमास्ते,ऋचाली पाटकर, मनीषा जामसंडेकर आदी उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page