विजय राणे यांची माहिती; २ ते ७ मे दरम्याने आयोजन
सावंतवाडी ता.०३ सिंधुरत्न कलावंत यांच्या वतीने कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, २ मे ते ७ मे दरम्याने हा महोत्सव सिंधुदुर्ग येथे संपन्न होणार आहे. अशी माहिती विजय राणें यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी या महोत्सवात स्थानिक कलाकारांना प्राधान्य देऊन आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
