मालवण ता.०३-:* महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मालवण तालुका नाभिक संघटना, महिला नाभिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील भैरवी मंदिर येथे आयोजित केलेलता रक्तगट तपासणी व हिमोग्लोबीन तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा ५५ नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी पूजा चव्हाण, सुनील खुपसे, उमेश पेडणेकर यांचे सहकार्य लाभले. राज्य प्रांत संघटक विजय सीताराम चव्हाण व डॉ. बालाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नाभिक संघटना मालवण तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रतिभा चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा दीपाली शिंदे, माजी तालुकाध्यक्ष विजय शिवा चव्हाण, महिला संघटना सचिव विशाखा चव्हाण, कार्याध्यक्षा अश्विनी आचरेकर, शहर अध्यक्ष कांचन चव्हाण, शैलजा चव्हाण, ललित चव्हाण, दीपक चव्हाण, संजय चव्हाण, अंकुश चव्हाण, जगदिश वालावलकर, नगरसेवक दीपक पाटकर, दिलीप वायंगणकर तसेच महिला उपस्थित होत्या. डॉ. बालाजी पाटील यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन कांता चव्हाण यांनी केले. आभार आनंद आचरेकर यांनी मानले.
