जिल्हा रुग्णालयात जागतिक कर्णबधिर दिन साजरा

सिंधुदुर्गनगरी ता ०३ ३ मार्च हा दिवस जागतिक कर्णबधीर दिन म्हणून साजरा केला जातो. या जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त कर्णबधीरता सप्ताहास सुरुवात करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांच्या हस्ते आज सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.

जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त आज पासून कर्णबधीरता सप्ताहास सुरुवात करण्यात आली असून या सप्ताहामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम ( RBSK ), डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरवेंशन सेंटर्स ( DEIC ) व मानसिक आरोग्यकक्ष यांच्या साहाय्याने आवाजाचे दुष्परिणाम, कानाची देखभाल, कर्णबधिरता व लक्षणे यांबद्दल शाळा, कॉलेज, जेष्ठ नागरिक, वृद्धाश्रम, शासकीय कार्यालय येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान शिबिरामधील लाभार्त्यांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, डॉ अपर्णा गावकर, डॉ राहुल जाधव, डॉ शाम पाटील,डॉ शाम राणे, डॉ जोशी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम ( RBSK ) कॉर्डिनेटर राजेश पारधी, डॉ श्रीधर पवार, प्रवीण पाटील, श्रीम. स्वाती रावले, कर्मचारी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page