वायंगणी पोयंडेवाडी जेटी बांधकामाची सखोल चौकशी व्हावी

जि .प. अध्यक्ष संजना सावंत यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

वेंगुर्ले ता.०३-:* जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत लहान मछीमार बंदराचा विकास करणे या योजनेअंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी पोयंडेवाडी येथे 25 लाख रुपये शासकीय निधीचा वापर करुन जेटी बांधकाम करण्यात आले आहे. सदर जेटी बांधकाम बाबत भ्रष्टाचार होत असून शासकीय निधीचा अपव्यय संगनमताने होत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याने सदर कामाची सखोल चौकशी करावी व संबंधित अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार याbचेवर कारवाई करावी अशी मागणी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

वायंगणी पोयंडेवाडी जेटीचे बांधकाम मे 2020 मध्ये सुरु करण्यात आले. जून 2020 मध्ये प्रथम आठवडयात ते वाहून गेले. उभारलेल्या जेटीच्या ठिकाणी समुद्रातून थेट होडी येत नाहि. किंवा जेटी पर्यंत जाण्याकरीता रस्ताहि नाहि. प्रत्यक्ष जागेवर शासन निर्णयानुसार जेटीचे बांधकाम झालेले नाहि. मस्य विभागाकडून सदर जागा जेटीसाटी योग्य नसल्याचा अहवाल संबंधित खात्यास सादर केलेला असतानाहि चुकीच्या जागी सदरचे बांधकाम करण्यात आलले आहे. शासन निर्णयामध्ये स्थानिक मछीमाराचे जेटीच्या बाधकामसाटी निवेदन प्राप्त असणे आवश्यक आहे. मात्र असे कोणतेहि निवेदन किंवा मागणी नसतानाहि जेटीचे बांधकाम केले गेले.

शासन निर्णयानुसार ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाटी निधी खर्च न करता जेटीच्या नावाखाली अन्य बांधकाम करुन शासनाची फसवणूक केली गेली आहे. वायंगणी ग्रा. पं. ने आयत्या वेळच्या विषयामध्ये सदर जेटीची मागणी घेतल्यावर सहाय़यक पंतन अभियंता यांनी प्रत्यक्ष जागेची पहाणी करुन नदीप्रवाहाची खात्री करुन अंदाजपत्रक तयार करणे आवश्यक होते. मात्र तशी कोणतीहि कार्यवाहि न करता चुकीच्या ठिकाणी जेटी बांधकाम करुन शासनाच्या निधीचा अपव्यय केला आहे. मे 20 मध्ये जेटीचे बांधकाम हाती घेण्यात आले व जून चे प्रथम आठवडयात बांधकाम वाहून गेले असेतानाहि 21 जून रोजी 10,84,966 इतकी रक्कम खर्च घालण्यात आली.

या घटनेस दोन वर्षाचा कालावधी उलटल्यावर गेल्या 8 दिवसापुर्वी तेथे अन्य बांधकाम केले जात असून त्याबाबत मस्य आयुक्त कार्यालय मालवण यास कळविले असतानाहि संबंधितांकडून काहिच कार्यवाहि केली गेली नाहि. त्यामुळे या बांधकामाबाबत प्रश्न निर्माण होत असून सदर कामात संगनमताने भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येत असल्याने याची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या बांधकामाबाबत वायंगणी येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी रितसर तक्रार दाखल केलेली आहे.

You cannot copy content of this page