कणकवली शहर युवासेनेच्या प्रमुखपदी आदित्य सापळे

उपशहरप्रमुखपदी सोहम वाळके तर तालुका समन्वयकपदी तेजस राणे

*⚡कणकवली ता.०३-:* कणकवली शहर युवासेनेच्या प्रमुखपदी आदित्य सापळे तर उपशहरप्रमुखपदी सोहम वाळके यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय तालुका समन्वयक म्हणून तेजस राणे ,कनेडी शहरप्रमुखपदी दिनेश वाळके , सांगवे शाखाप्रमुखपदी तुषार गावकर यांची निवड करण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्ती पत्र सिंधुदुर्ग युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते देण्यात आले. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार खासदार विनायक राऊत , युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई , जिल्हासंपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी ही निवड केली आहे.

यावेळी सेनेच्या महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत – पालव,नगरसेवक रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर,शहर प्रमुख शेखर राणे,उपजिल्हा प्रमुख सुजित जाधव,प्रमोद मसुरकर,प्रसाद अंधारी,भूषण परुळेकर, महेश कोदे,भिवा परब,बाबू जाधव,दिव्या साळगावकर,वैभव मालंडकर , चेतन अंधारी, चेतन मुंज, श्रीपाद सापळे,गुरु वाळके, मयुर पेडणेकर, विशाल कसालकर, परेश बागवे, जय शेट्ये,श्रीपाद सापळे आदी शिवसेना पदाधिकारी युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page