मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत नाही

जिल्हा परिषद कारभार;मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचा आरोप

कुडाळ ता.०३-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषद हे खरेदी आणि अनियमितता असे समीकरण बनले असून, या सर्व प्रकारात तेच तेच अधिकारी व कर्मचारी वारंवार आढळून देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने ते अधिकारी मुजोर बनत चालले आहेत. असा आरोप मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी अधिकाऱ्यांवर केला आहे.

यावेळी ते पुढे म्हणाले की, कारवाई प्रक्रिया दडपून अधिकाऱ्यांवर दबाव आणत भ्रष्टचारात गुरफटलेल्या या भ्रष्ट प्रवृत्तींना पाठीशी घालणाऱ्याची नावे उघड होणे गरजेचे आहे. वॉटर प्युरिफायर, टेलिव्हिजन, सोलर, संगणक, शेगडी अशी अनियमितता व घोटाळा दर्शवणारी प्रकरण उघड होऊन देखील त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कारभाराविषयी जनतेसमोर चुकीचा संदेश जात असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page